Ad will apear here
Next
‘महायुती’कडून राजेंद्र गावित यांचा उमेदवारी अर्ज दाखल


पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी हजारो कार्यकर्ते आणि मतदारांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पाचबत्ती ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान यानिमित्ताने महायुतीचा भव्य रोड शो आयोजित केला होता.

शिवसेना व ‘भाजप’चे झेंडे आणि ढोल-ताश्यांच्या गजरात ही मिरवणूक मोठ्या उत्साहाने निघाली. गावित यांच्या समर्थनार्थ महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच गर्दी केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत शिवसेना नेते एकनाथ शिंदे, ‘भाजप’चे नेते विनोद तावडे, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, आमदार पास्कल धनारे, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित, श्रीनिवास वनगा, ज्योती ठाकरे, पालघर जिल्हा संघटक ज्योती मेहेर, ‘रिपाई’चे सुरेश जाधव, शिवसेना पदाधिकारी विलास जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

पालघर मतदारसंघात मतदानाच्या चौथ्या टप्प्यात म्हणजे २९ एप्रिल रोजी मतदान होत असून, या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी हा अर्ज दाखल करण्यात आला आहे.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZWFBZ
Similar Posts
‘पालघर पोटनिवडणुकीत ‘कर्नाटक’चे प्रतिबिंब दिसेल’ पालघर : ‘कर्नाटकच्या विजयाचे प्रतिबिंब पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालातही दिसेल,’ असा विश्वास भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी व्यक्‍त केला.
राज्यस्तरीय ढोलकीवादन स्पर्धेत तेजस मोरेचे यश ठाणे : सांगली येथे घेण्यात आलेल्या ढोलकीबहाद्दर तानाजी वाडकर स्मृती ढोलकीवादन राज्यस्तरीय स्पर्धेत प्रख्यात ढोलकीवादक कृष्णाजी घोटकर यांचा शिष्य तेजस पुंडलिक मोरे दुसर्‍या क्रमांकाचा मानकरी ठरला.
‘भाजप’ राज्य निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महाराष्ट्रच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १४ मार्च २०१९ रोजी मुंबईत झाली.
कोकण विकास मंचचा भाजपला जाहीर पाठिंबा पालघर : जिह्यातील सामाजिक कार्यकर्ते नीलेश सांबरे यांच्या कोकण विकास मंचाने भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्यानंतर भाजपला पाठिंबा देत असल्याची घोषणा सांबरे यांनी केली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language